Urmila Deven

मी उर्मिला देवेन, M Tech. जपानच्या टोकियो शहरात सॉफ्टवेअर फील्ड मध्ये काम करते.
माझा स्वतःचा NGO आहे. जिथे आम्हीं लहान मुलांच्या शिक्षणासाठी काम करते. खास करून स्लम भागातल्या आणि गावातल्या. माझी स्वतःची शाळा नक्सलवादी भागात गडचिरोलीमध्ये आहे. जेथे आम्ही गरीब आणि गरजू मुलांना विनामूल्य इंग्रजी शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली आहे. शाळेचा सर्व खर्च आम्हीं स्वतः करतो. तसेच माझ्या NGO च्या माध्यमातून वर्षभरात बरेच लहान मोठे मुलांसाठी आणि स्त्रियांसाठी प्रोजेक्ट राबवत असते. दर वर्षी १०० मुलांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न असतो. आतापर्यंत अश्या विविध प्रोजेक्टच्या माध्यमातून आम्हीं ५००० गरजू मुलांपर्यंत पोह्चलेलो आहोत.
मी, माझ्या लेखणीतून सामाजिक प्रश्न मांडण्याचा आणि प्रोत्साहन देण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते. माझा हा कथासंग्रहही सामजिक प्रश्नांनी गुंफलेला असून त्यातले नायक आणि नायिका वास्तविक जगातल्या भूमिका निभवत अजुनीही आपल्यात प्रेमाला जिवंत ठेवत आहे.
माझ्या मातृवाने खूप शिकवलं मला, जगातल्या चांगल्या आणि वाईट अनुभवाची ओळख मला त्याच वाटेत झाली. मग माझ्या मातृत्वाचे अनुभव कुणाच्यातरी कामी यायला हवेत, म्हणून मी ते लिखाणाच्या माध्यमातून शेअर करते. मी समाधानी आहे कि मी दोन मुलींची आई आहे पण माझ्या शाळेची मुलं बघतली कि मी आनंदाने भारावून जाते.
माझी नवऱ्यासोबतची मैत्री अजूनही प्रवास करत बहरतच आहे. त्याच्या मैत्रीने मी उभी आहे, तठस्थ! प्रेमाच्या नात्याने मी श्वास घेते आणि मातृत्व मला समाजकार्य करायला प्रेरणा देत. जीवनाचे कडू गोड अनुभव मला माझ्या लेखणीत शाहीच काम करतात. मी वगवेगळ्या ब्लॉगिंग साईटवर माझे लेख प्रसिद्ध करते. कथा, ललितलेख, लेख आणि कविता लिहिण्यात मला आनंद मिळतो. आधुनिक काळातले विषय हाताळायला मला खूप उत्सुकता असते. इतिहासत रुची आहे आणि विज्ञान मला प्रेरणा देत असत. लवकरच ऐतिहासिक फिक्शन विषयातली कादंबरी प्रकाशित करणार आहे. वाचकांचा पर्चंड पर्तिसाद मला भारावून टाकतो. ३०० कथा ७० लेख आणि ३० कविता, पेपर, माग्झीन, दिवाळी अंक, ब्लॉगिंग साईट आणि इतर सोशल मिडिया माध्यमाने प्रकाशित झालेले आहेत. मराठी मोम्स्प्रेसो ब्लॉगिंग साईटची सेप्टेंबर २०१८ ते ऑक्टोंबर २०१९ पर्यतची पहिली मराठी ब्लॉगर आहे जिने सतत एका वर्षा पेक्षा जास्त पहिला नंबर कायम ठेवत लोकांच्या मनावर लिखाणाने राज्य केल. गेल्या दोन वर्षापासून वाचकांच अतोनात प्रेम मला मिळत आहे.
खर तर मराठी माध्यमातून लिखाण हे माझ्यासाठी अगदीच आवाहनात्मक आहे; पण ते मी स्वीकारलं आहे. तेव्हा माझ्या लिखाणातील चुकांना माझ्या वाचकांनी दर्शवल्यास माझ लिखाण अजूनच उजडेल हि आशा करते. तुमच प्रेम आणि मार्गदर्शन असच अनंत राहो हीच सदिच्छा.
अजून खूप दूर चालायच आहे. आयुष्याच्या वाटेवर जीवनाची परीक्षा सुरूच आहे., जवाबदारी वाढली आहे,. नात्याचं छत्री दिवसे न दिवस वाढत आहे. पालकत्व एक आवाहन म्हणून समोर आहे. वाढत्या वयानुसार नात्यात मूरत, माझ्या लेखणीला मी बहरवण्याचा प्रत्येक प्रयत्न करणार आहे. अर्थात, वाचकांची दाद हवीच. नुसती कौतुकाची दाद नको तर मला वाचकांच्या मार्गदर्शनाचीही गरज आहे.





उर्मिला देवेन